परभणी: नवा मोंढा भागात 6 दुकाने फोडली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
परभणी शहरातील नवा मोंढा भागात चोरट्यांनी सहा दुकाने फोडण्याची घटना मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.रक्कम व इतर साहित्य मिळून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.ही घटना सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.