अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यासह राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी या उदात्त हेतूने एक कोटी ११ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला आज (ता. १७) दिले. बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले व संचालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हा मदतीचा धनादेश दिला.