भंडारा-वरठी मार्गावरील दाभा मोडजवळ आज, सोमवार ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा. दरम्यान एक थरकाप उडवणारा अपघात घडला. या अपघातात टिप्परच्या मागील चाकाखाली आल्याने दुचाकी चालक तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी असलेले निलेश शेंडे हे आपल्या युनिकॉन दुचाकीने (क्र. MH 36 AN 2229) जात असताना, दाभा गावाजवळ वेगाने येणाऱ्या एम एच 40 डीसी 3577 या क्रमांकाच्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टिप्पर चालकाने...