बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, अजनी ते खापरी रेल्वे लाईन दरम्यान रेल्वेच्या धडकेने एका ६० वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयत वृद्धाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे