गडचिरोली: अकोला येथील शिवार फेरीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांचे आवाहन
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला तर्फे विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून दिनांक २० ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत विद्यापीठात शिवार फेरी व थेट पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला येथे २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.