तेल्हारा: तेल्हारा हल्ला प्रकरणातील आरोपी शंकर भोजनेचा जामीन अर्ज अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला!
Telhara, Akola | Nov 11, 2025 तेल्हारा शहरात २२ वर्षीय युवकावर गळ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी शंकर सिद्धार्थ उर्फ राजू भोजनेचा जामीन अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी नामंजूर केला आहे. आरोपीने वैरातून रवींद्र पोहरकारवर चाकूने हल्ला केला होता. सरकारी वकील अजित देशमुख यांनी आरोपीला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, असे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर भोजने यांचा जामीन अर्ज फेटाळला.