जालना: सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला रोहित पवार आंदोलन करू शकत नाही,रेल्वे स्टेशन येथे ओबीसी नेता नवनाथ वाघमारे यांचा टोला
Jalna, Jalna | Jun 15, 2026 आज दिनांक 15 जुन रोजी 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आमदार रोहित पवार यांचा चांगला समाचार घेतला आहे रोहित पवार यांनी दोन दिवसापूर्वी आमरण उपोषण केले आहे,व शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आमरण उपोषण केल्याचा गाजावाजा सुद्धा केला आहे, मात्र सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला रोहित पवार शेतकऱ्यांसाठी काय आंदोलन करेल तो मॅनेज आंदोलन करेल असे म्हणत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी खरपूस समाचार घेतला.