मौदा: मारोडी शिवारात भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध मौदा पोलिसांत गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | May 26, 2025 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या मारोडी शिवारात वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटारसायकल ला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा-नागपूर महामार्गावरील मारोडी शिवारात घडली. संजय रायभान उके वय 31 वर्षे राहणार वार्ड क्रमांक 15 मौदा असे मृतक तरुणाचे नाव आहे. मृतक हा मारोडी वरुन मौदा कडे जात होता. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालक विरुद्ध मौदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.