दर्यापूर: खा.बळवंत वानखडे यांच्या हस्ते तांडा वस्ती सुधार योजनेतर्गत तालुक्यात ६० लाखांच्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन
दर्यापूर तालुक्यातील रामगाव,पेठ इतबारपूर,लेहेगाव,सोनखास (लेहेगाव), एरंडगाव व रामतीर्थ या गावांमध्ये वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्ते बांधकामाच्या कामांचे भूमिपूजन आज दुपारी ३ वाजता खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.या सोहळ्याला आमदार गजानन लवटे (दर्यापूर विधानसभा),तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे,माजी सभापती जिप सभापती बाळासाहेब हिंगणीकर, कृ.उ.बा.स दर्यापूर सभापती सुनील गावंडे उपस्थित होते.