गोंदिया: अंभोरा येथे लाकडी काठीने मारहाण, रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 दि.16 ऑक्टोबर च्या रात्री 99 वाजेच्या सुमारास अंभोरा येथे फिर्यादी अविनाश डोंगरे व फिर्यादीचा मोठ्या आईचा मुलगा निक्की हे फिर्यादीचा मामेभाऊ राकेश देशभ्रतार याला समजविण्यास गेला असता त्याने विनाकारण शिवीगाळ करून फिर्यादीच्या मोठ्या आईचा मुलगा निक्की यास धक्काबुक्की करून फिर्यादीला लाकडी काठीने डोक्याला व डाव्या बाजूच्या कमरेला मारल्याने दुखापत केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास रावनवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.