ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्याने दहशत माजवली आहे. अंबरनाथ, बदलापूर,कल्याण, मीरा-भाईंदर परिसरामध्ये बिबट्या प्राण्यांची शिकार करत आहेत तसेच नागरिकांवर देखील हल्ला करत आहे. अशीच घटना कल्याणच्या वसत परिसरात घडली आहे. फार्म हाऊस मध्ये असलेल्या गोठ्यात शिरून बिबट्याने तीन वासरांचा फरशा पडला आहे. शेतामध्ये सर्वत्र हा बिबट्या फिरत आहे,त्यामुळे आमच्या गुराढोरांसह आम्हाला देखील धोका निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी महिलांनी केली आहे.