जालना: कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई; 25 हजारांचा प्रतिबंधित रजनीगंधा पान मसाला जप्त, दोघांवर गुन्हा
Jalna, Jalna | Jun 26, 2026 कदीम जालना पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे हकीम मोहल्ला, जुना जालना परिसरात छापा टाकून 25 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित रजनीगंधा पान मसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शुक्रवार दि. 26 जून 2026 रोजी रात्री 8 वाजता पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डी.बी. पथकाने हकीम मोहल्ला परिसरात छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला रजनीगंधा सुगंधित पान मसाला जप्त केला.