औसा: औसा तालुक्यातील काळमाथा येथील लेकमाता प्रिया निकम यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार पुणे येथे प्रधान
Ausa, Latur | Nov 1, 2025 औसा –औसा तालुक्यातील काळमाथा गावच्या लेकमाता आणि सायकासॉफ्ट इंडिया प्रा. लि. च्या संस्थापिका सौ. प्रिया सिद्धनाथ निकम यांना “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार 2025” या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने पुणे येथे गौरविण्यात आले. हा सन्मान शुक्रवार, दिनांक 31 ऑक्टोबर रोजी आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, पुणे येथे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त झालेल्या भव्य राष्ट्रीय समारंभात प्रदान करण्यात आला.