जळगाव: कुसुंबा येथे जळगाव ग्रामीण शिवसेना ठाकरे गटाचे 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने 'माझं कुंकू, माझा देश' या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत, जळगाव ग्रामीण तालुक्यात केंद्र सरकारचा निषेध केला. रविवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कुसुंबा गावात हे आंदोलन करण्यात आले. भारताने 'ऑपरेशन सिंधूर' राबवल्यानंतरही पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. या निर्णयाच्या विरोधात जळगाव महिला आघाडीने रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.