पेण: अलिबाग-वडखळ रस्त्याची चाळण: खड्ड्यांनी प्रवाशांचे कंबरडे मोडले; BMW सारखी महागडी गाडीही चिखलात रुतली
मनसे नेते किरण गुरव
Pen, Raigad | Oct 5, 2025 अलिबाग-वडखळ रस्त्याची गेल्या तीन महिन्यांपासून झालेली दुरवस्था कायम आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि चिखलामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत, अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) रस्ते आस्थापना रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी केली आहे.रस्त्याची अवस्था किती वाईट आहे, याचे उदाहरण देताना गुरव यांनी एक धक्कादायक बाब निदर्शनास आणली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवास करत असलेली एक BMW सारखी कार रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रस्त्यात चिखलात रुतली.