भोकरदन: टाकळी बाजड येथे शॉर्टसर्किट होऊन मकाच्या 5 एकर क्षेत्रफळाला लागली आग, पूर्ण जळून खाक
आज दिनांक 23 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील टाकळी बा.येथे काल दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली आहे, व या आगीमध्ये पूर्ण मका पीक जळून खाक झाले असून यामध्ये शेतकरी अनिल संतुकराव खिल्लारे यांचे 5 एकर क्षेत्रावर असलेल्या मका पीक हे होत्याचे नव्हते झाले असून परिसरात झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.