सातारा: साताऱ्यात आईसाहेब प्रतापसिंह मंडळाची काकड आरती; हजारो दुर्गा भक्तांच्या जयजयकारात सातारा दुमदुमला
Satara, Satara | Sep 23, 2025 साताऱ्यात नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू आहे… देवीभक्तीचा माहोल आणि भक्तांची अभूतपूर्व गर्दी यामुळे संपूर्ण शहर उत्सवी रंगात न्हाऊन निघालं आहे. आईसाहेब प्रतापसिंह मंडळात आज सकाळी पार पडलेल्या काकड आरतीला भक्तांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात, शंखनादात आणि देवी जयकारांत वातावरण अक्षरशः दुमदुमून गेलं.पहाटेपासूनच भाविकांची गर्दी मंडप परिसरात होऊ लागली. सकाळी आरतीवेळी महिलांपासून लहान मुलं, युवक, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनीच मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला.