पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षासह शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार करुणा नाईक यांच्यासह माजी सरपंच आणि अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे पनवेलमध्ये भाजपची ताकद अधिक वाढली असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.