पातुर: अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केलेल्या शिक्षकांची तात्काळ हकालपट्टी न झाल्यास शाळेला कुलूप ठोकू, पालकांचा इशारा
Patur, Akola | Nov 13, 2025 चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सुधाकर जानकीराम पांडे याने पाच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अकोला न्यायालयानं त्याला तुरुंगात डांबलंय. ही घटना ११ नोव्हेंबरला उघड झाली. एका पीडित विद्यार्थिनीने आईला सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पॉक्सो आणि भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवला. दरम्यान, या शिक्षकाची तात्काळ हकालपट्टी न झाल्यास शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा दिला आहे.