चंद्रपूर: जिल्ह्यातील चेकपिपरी शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
जिल्ह्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील चेकपिपरी शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भाऊजी पत्रू पाल (वय ७०) यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दि 19 ऑक्टोबर सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड तणाव आहे.