अमरावती: अल हिलाल कॉलनी पांढरी हनुमान मंदिराच्या जवळून एमडी चा एकूण 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, शहर गुन्हे शाखेची कारवाई
दिनांक 15.10.2025 रोजी गुन्हे शाखेला माहिती मिळाली की *अब्दुल राजिक अब्दुल ताहीर वय 32 वर्ष रा. अल हिलाल कॉलनी अमरावती* हा एका काळया मोपेड गाडीवर एमडी ची विक्री करणे करिता पांढरी हनुमान मंदिराचे बाजूला येणार आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस घटनास्थळावरून पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याचेकडून 1) एमडी ड्रग्स 56gm किंमत अंदाजे 5,60,000 रु, 2) बर्गमन कंपनीचे मोपेड गाडी किंमत 1,10,000 रु., ३) Vivo कंपनी चा मोबाईल किंमत अंदाजे 10, 000 रु. असा एकूण 6,80,000 / रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आहे