अमरावती: आदिवासी समाजाची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक ; बोगज घुसखोरी व आरक्षणाच्या प्रश्नांवर तीव्र निषेध
जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आदिवासी संघ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करीत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की धनगर व बंजारा समाजातील काही घटक आदिवासी प्रवर्गात सामील होण्यासाठी दबाव टाकत असून प्रशासन त्याला बळी पडत आहे. त्यामुळे खरी आदिवासी जनता शिक्षण, नोकरी आणि आरक्षणाच्या हक्कांपासून वंचित राहत असल्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान आदिवासी विकास मंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटोला गाजराचा हार घालून निषेध क