चोपडा: नरवाडे गावातून एसटी बस द्वारे चोपडा येथे आलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले, चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 17, 2025 चोपडा तालुक्यातील नरवाडे हे गाव आहे. या गावातून शिक्षणासाठी चोपडा शहरात एसटी बस द्वारे आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.