हिंगोली: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या,सकल धनगर समाज बांधवांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन जालना या ठिकाणी एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपक बोऱ्हाडे यांचे अमरण उपोषण तात्काळ सोडवण्याची मागणी आज सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार सेनगांव यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.