जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेतील दोन सराईत आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ८० हजार रुपये किमतीची ८ ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे.