नागपूर ग्रामीण: कोराडीत रेल्वे लोको पायलटचे घर फोडले; २.७० लाखांचा ऐवज लंपास
कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा येथील स्मृती नगरमध्ये एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी २,७०,००० किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी राजू रामप्रियसिंग चव्हाण, जे रेल्वेमध्ये लोको पायलट आहेत, हे आपल्या घराला कुलूप लावून ड्युटीसाठी बल्लारशाह येथे गेले होते.