अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 26 करिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाच्या उमेदवारांना गॅस सिलेंडर ही निवडणूक निशाणी देण्यात यावी अशी मागणी आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली वंचित बहुजन आघाडी हा नोंदणीकृत राजकीय पक्ष असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विविध प्रभागातून निवडणूक लढवत आहेत