जालना: मोबाईल हिसकावणार्या टोळीचा पर्दाफाश; कदीम जालना पोलिसांची कारवाई, 8 मोबाईल व दुचाकी जप्त
Jalna, Jalna | Apr 8, 2026 कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकलवर येऊन मोबाईल हिसकावणार्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून एक आरोपी व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत दोन गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून अंदाजे 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की,दि.4 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास टिपू सुलतान चौक,रेल्वे स्टेशन परिसरात तसेच रात्री देखील घटना घडली.