गेवराई: शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी गेवराईतील दगडवाडी येथे शेतातील बांधावरच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले
Georai, Beed | Oct 9, 2025 नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांचे बांधावर धरणे आंदोलन बीड जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यामध्ये धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. गेवराई तालुक्यातील औरंगपूर कुकडा येथे परिणामी शेतकरी हताश झाला असून २०२३ च्या निकषाप्रमाणे बागायती जमीन असताना शेतकऱ्यांना जिराईत जमीन म्हणून मदत दिली जात आहे. अधिकारी पंचनामा करायला सहकार्य करत नाहीत. यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी थेट आता गावातीलच शेतीच्या बांधावर धरणे आंदोलन