जालन्यात जुना मोंढा परिसरात ५१ रुपयांत साडीची ऑफर; दुकानासमोर महिलांची उसळलेली गर्दी, पोलिसांकडून दुकानदाराला समज.. आज दिनांक 27 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना मोंढा परिसरात ५१ रुपयांत साडी देण्याची आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आल्याने मोठी गर्दी उसळल्याची घटना समोर आली आहे. गर्दीचे योग्य नियोजन न करता ऑफर जाहीर केल्यामुळे पोलिसांनी संबंधित कापड दुकानदाराला समज देत खबरदारीचा इशारा दिला. मिळालेल्या माहितीनुसार, जुना मोंढा परिसरातील एका कापड दुकानान