नागपूर ग्रामीण: रक्षकच निघाली भक्षक! छेडछाडीच्या तक्रारीवर कार्यवाही न करण्यासाठी व महिला पोलीस उपनिरीक्षकाने केली लाचेची मागणी
वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बेंके यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.तक्रारदाराच्या विरोधात दाखल झालेली छेडछाडी च्या तक्रारिवर कारवाई टाळण्यासाठी प्रणाली बेंके यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच पोलीस स्टेशन वाठोडा येथे घेण्याची तयारी दर्शविली परंतु तक्रारदार यांच्यावर संशय आल्याने ती लाच त्यांनी स्वीकारली नाही.