धामणगाव रेल्वे: मंगरूळ फाटा नजीक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी चालकाचा अपघात; दोन जण जखमी
मंगरूळ फाटा नजीक परिसरात झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून हा अपघात घडला. यात राहुल ठाकरे हा युवक गंभीर जखमी झाला आहे.अपघात झाल्याची माहिती मिळताच गस्त घालत असलेले 112 वाहनाचे चालक व दत्तापूर पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल मनोज धोटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वेळ न दवडता त्यांनी जखमींना 112 गाडीत टाकून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, जखमी राहुल ठाकरे याला पुढील उपचाराकरता अमरावती रेफर