जालना: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागस्तरीय तपासणी; स्वच्छतेच्या कामात सातत्य ठेवण्याचे आवाहन
Jalna, Jalna | Jun 18, 2026 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर पुरस्कार प्राप्त केलेल्या गावांनी स्वच्छतेच्या कामात सातत्य राखावे. स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देणारी गावे आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत असल्याचे प्रतिपादन विभागीय अप्पर आयुक्त (विकास) सुषमा देसाई यांनी केले. गुरुवार दि. 18 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील वरुडी तसेच जालना तालुक्यातील सावरगाव (हडप) ग्रामपंचायतींच्या विभागस्तरीय तपासणी प्रसंगी बोलत होत्या.