दिग्रस: कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव, शेतकरी त्रस्त
दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी५:३० वाजताच्या दरम्यान दिग्रसच्या बाजार समितीच्या परिसरात पिण्याचे स्वच्छ पाणी, बसण्यासाठी व्यवस्था तसेच शेतमाल ठेवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नाही, अशी तक्रार अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत दीर्घकाळ थांबावे लागते. मात्र, त्या काळात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे.