जिल्ह्यात विविध ठिकाणी घर फोड्या करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आष्टीच्या वाकी शिवारात मुसक्या आवळल्या
Beed, Beed | Sep 16, 2025 बीड जिल्ह्यात वाढत्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा बीडने - कारवाई करून दिवसा घरफोडी करणारा - आरोपी वाकी शिवारात जेरबंद केला. या कारवाईत तब्बल ९४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या - माहितीनुसार, बर्दापुर पोलीस ठाण्यात – गु.र.नं. २०५/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१(३) बी. एन. एस. अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल होता.