मुरबाड: अंबलै आदिवासी वाडी येथे रस्ते कामांचा भूमिपूजन सोहळा नागरिकांच्या साक्षीने पार पडला
Murbad, Thane | Nov 24, 2025 आज सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत अंबलै आदिवासी वाडी येथे रस्ते कामांचा भूमिपूजन सोहळा नागरिकांच्या साक्षीने पार पडला. आता या भागात रस्तेचाच नव्हे तर संपूर्ण आदिवासी वाड्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. या कामामुळे रहिवाशांना संपर्क, बाजारपेठा व सेवा अधिक सोप्या होणार आहेत, ज्यामुळे त्यांचा जीवनमान उंचावेल. शिवसेनेचे हे वचन आहे की आम्ही हा विकासाचा गतीशील प्रवास संथ होऊ देणार नाही, तर प्रत्येक गाव, आदिवासी वाडी आणि अनेक दुर्गम भागांमध्ये मुलभूत विकासकार्ये असेच लवकरात लवकर पोहोचवत राहू. असे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले.