चांदूर रेल्वे: पळसखेड येथे घरात घुसून अज्ञात चोरट्याने केली चोरी
द्वारकाबाई गुणवंत मते वय वर्ष बहात्तर राहणार पळसखेड यांनी अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलाही मुलीच्या घरी जेवण करून तिथेच झोपली .सकाळी घरी गेली असता, घराचा मुख्य दरवाजा उघडून आत गेली असता, दुसऱ्या दरवाज्याचे कोंडा तुटलेला दिसला. लोखंडी पेटी उकलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यातील सामान फेकलेले दिसले नगदी 11 हजार रुपये घरकुल बांधकामाकडे मिळालेले 15000 रुपये असे एकूण 26 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे.