सेनगाव: म्हाळसापुर व गणेशपुरी येथील नागरिकांच्या वाढीव वीज बिलाच्या संदर्भात ओम कोटकर यांनी सोडविल्या समस्या
सेनगाव तालुक्यातील म्हाळसापुर व गणेशपुर येथील नागरिकांच्या वाढीव वीज बिलाच्या संदर्भात भाजपाचे ओमभाऊ कोटकर यांनी आज महावितरण कार्यालयात धाव घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील काही महिन्यापासून म्हाळसापुर व गणेशपुर येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल येत असल्याने नागरिकांनी सदर विषय ओमभाऊ कोटकर यांच्या निदर्शनास आणून दिले.