नागपूर ग्रामीण: वाडी परिसरात प्रशासनाचा 'बुलडोझर'; मुख्य मार्गावरील अतिक्रमणांवर धडक कारवाई
वाडी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने आज परिसरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत अतिक्रमणांवर मोठी कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते, ज्याची दखल घेत आज ही मोहीम राबवण्यात आली.सकाळपासूनच नगर परिषदेचे पथक जेसीबी आणि कर्मचाऱ्यांसह वाडीतील मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या चौकांमध्ये दाखल झाले होते.