जालना: नूतन वसाहत, उडान पूल ,अंबड चौफुली परिसरात तापमानामुळे मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट
Jalna, Jalna | Jun 8, 2026 आज दिनांक ८ जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 :30वाजेच्या सुमारास जालना शहरातील नूतन वसाहत उडानपूर अंबड चौफुली यासह संपूर्ण शहरासह जिल्हाभरात आज 42 डिग्री सेल्सिअस तापमान होते त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे ,नागरिकांनी मुख्य कामे सोडता घराबाहेर पडणे आज टाळले असून त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर व बाजारपेठेत शुकशुकाट पसरल्याचे सुद्धा आज संपूर्ण जालना शहरात पहायला मिळाले आहे.