महिलेच्या सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी संगमनेर : संगमनेर बस स्थानकातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले, ही घटना शनिवारी (दि.०६) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात ६८ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. आशालता मनोहर आहेर (रा. घारगाव, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आशालता आहेर आणि त्यांचे पती हे नातेवाइकांना भेटण्यासाठी अकोले होत