उत्तर सोलापूर: अतिवृष्टी व पुरामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. शहराध्यक्ष चेतन नरोटे
अतिवृष्टी व पुरामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या पुढाकाराने मंगळवारी दुपारी 12 वाजता सहा गाड्यांमधून धान्य, पिण्याचे पाणी, कपडे व जीवनावश्यक साहित्य पुरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले. नरोटे म्हणाले, “आम्ही केवळ घोषणा करून थांबत नाही, तर संकटग्रस्तांच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहतो. या मदतसामग्रीमुळे पुरग्रस्तांना थोडासा दिलासा मिळेल.”