कराड: कराड पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले 7 लाखांचे मोबाईल फोन तक्रारदारांना केले परत
Karad, Satara | Sep 27, 2025 कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले, चोरीस गेलेले, 7 लाख रुपये किमतीचे एकूण 22 मोबाईल, तक्रारदार यांना परत केले, डी.बी. पथकाकडून सन 2025 मध्ये आज अखेर 12 लाख रुपये किमतीच्या एकूण 60 मोबाईलचा शोध लागला आहे, कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस आमदार यांनी, कर्नाटक राज्यातून तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून तांत्रिक विश्लेषणा द्वारे माहिती घेऊन, मोबाईल फोन प्राप्त केले.