इगतपुरी तालुक्यातील मुंबई–नाशिक महामार्गावर ठाकूरवाडी परिसरात आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण घटना घडली. सल्फरने भरलेल्या एका चालत्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रक क्रमांक **MH 11 AL 4519** हा मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. ट्रकच्या इंजिन भागातून अचानक धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान दाखवत तात्काळ ट्रक महामार्गाच्या कडेला उभा केला आणि खाली उतरला. काही क्षणातच ट्रकने प