अंजनगाव सुर्जी: नवदुर्गा,दसरा,दिवाळी सणानिमित्त पोलीस स्टेशन येथून पोलीसांनी काढला रुट मार्च
नवदुर्गा,दसरा,दिवाळी सणानिमित्त अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथून आज बुधवार दिनांक २४ सप्टें रोजी सकाळी ११ वाजता अंजनगाव सूर्जी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढला.चालू असलेल्या नवदुर्गा तसेच आगामी दसरा दिवाळी सणाच्या पर्वावर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये,कायद्याचे उल्लंघन होवू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सुरज बोंडे यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला.