उत्तर सोलापूर: “आमदार देवेंद्र कोठे छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलचं अस्तित्व संपवू पाहत आहेत”: माजी महापौर मनोहर सपाटे यांचा गंभीर आरोप..
छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलावर आमदार देवेंद्र कोठे यांनी राजकीय हेतूने कारवाई सुरू केली असून, या प्रतिष्ठित संस्थेचं अस्तित्व संपवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर मनोहर सपाटे यांनी रविवारी दुपारी 12 वाजता पत्रकारांशी बोलताना केला आहे. सपाटे म्हणाले की, “शिक्षण संकुलाने अनेक वर्षांपासून गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र आमदार कोठे हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी या संस्थेच्या कामकाजात अडथळे निर्माण करत आहेत.