अलिबाग: एलईडी दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाले मंदिर
चौल येथील रामेश्वर मंदिरात दीपोत्सव
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रोषणाई
Alibag, Raigad | Nov 5, 2025 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अलीबागच्या चौल येथील श्री रामेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरावर एल ई डी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत दिव्यांच्या विविधरंगी प्रकाशात मंदिर आणि मंदिराचा परिसर न्हाऊन निघाला. मंदिरासमोरील पुष्करणीत या विद्युत रोषणाईचे पडणारे प्रतिबिंब अधिकच खुलून दिसत होते. यावेळी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. हा दिव्यांचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.