परळी: अज्ञातांकडून घाटनांदुरा मतदान केंद्रावर ईव्हीएमची मोडतोड, जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा मतदान प्रक्रिया केली सुरळीत
Parli, Beed | Nov 20, 2024 परळी मतदार संघात येत असलेल्या,अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे बूथ केंद्रावर बुधवार दि.20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता राडा झाला. गैर प्रकार घडल्याचे दिसून आल्यानंतर हा प्रकार घडला. येथील बूथ केंद्रातील ओटिंग यंत्र, खुर्ची, टेबल यांची मोडतोड करण्यात आली त्यामुळे काही काळ या बुत केंद्रावरील मतदान थांबविण्यात आले होते.बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्या ठिकाणी नवीन यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.