ठाणे: 8 तारखेपर्यंत दहिसर टोल नाका मीरा-भाईंदर पुढे शिफ्ट केला जाईल, परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडचे आ. प्रताप सरनाईक
Thane, Thane | Oct 18, 2025 वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी दहिसर टोल नाका मीरा-भाईंदरच्या पुढे शिफ्ट होणार आहे. त्यासाठी आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12च्या सुमारास परिवहन मंत्री तथा आवळा माजीवाडा विधानसभेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली आहे. 8 तारखेपर्यंत हा टोल नाका मीरा-भाईंदर पुढे शिफ्ट केला जाईल असं त्यांनी सांगितलं.