17 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवा पिढीमध्ये वाढत्या अमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी नागपूर शहर पोलीस दलाने एक स्तुत पाऊल उचलला आहे. रन फ्रॉम ड्रग्ज रन फॉर लाईफ या मुख्य संदेशासह नागपुरात आगामी 25 जानेवारीला भव्य टायगर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्ता डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.